क्रीडारत्नागिरी

राष्ट्रीय तायक्वॉंदो पंच व रिफ्रेशर परीक्षेमध्ये सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी दापोलीच्या प्रशिक्षकांची उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरी दि. १ :- तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असो. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० ते ३१ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय तायक्वॉंदो पंच व रिफ्रेशर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही परीक्षा पार पडली ही परीक्षा अखिल भारतीय (ऑल इंडिया) स्तरावर आयोजित करण्यात आली होती.खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची कसून चाचणी या परीक्षेत घेण्यात आली.

परीक्षेसाठी दापोलीतील सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी दापोलीचे तालुका प्रमुख प्रशिक्षक श्री.प्रथमेश दाभोळे राष्ट्रीय पंच रिफ्रेशर तसेच तालुका प्रमुख महिला प्रशिक्षिका सौ.प्रिती प्रथमेश दाभोळे व प्रशिक्षक श्री. शैलेश मिसाळ यांनी राष्ट्रीय पंच परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली.

त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. प्रथमेश दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. या तिघांच्या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा आणि सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी, विष्णू गोडसे, प्रदिप दाभोळे, सिध्दाई तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी दापोलीच्या सहसचिव महेश्वर जाधव, कोषाध्यक्षा श्रद्धा दाभोळे सदस्य श्री मंगेश गोडसे यांनी तिघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button