३ एप्रिल रोजी खालगाव मधली गोताडवाडी येथे सादर होणार सचिन शितप लिखित – दिग्दर्शित नाट्यकृती ‘एक होतं गाव’

विल्ये दि. २८ :- शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रात्री १०:३० वा. हनुमान सेवा मंडळ, श्री देव हनुमान मंदिर खालगाव मधली गोताडवाडी ता.जि. रत्नागिरी आयोजित श्री.हनुमान जयंतीच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एक दर्जेदार दोन अंकी नाटक रत्नागिरीतील तरवळ गावचे सुपुत्र सचिन शितप लिखित दिग्दर्शित “एक होतं गाव ” हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. गावच्या विकासासाठी अहोरात्र लढणाऱ्या एका जिद्दी तरुणाची चित्तथरारक,कर्म कहानी, तरुणांची जिद्द आणि गावाचा विकास याचा अनोखा संगम या नाटकातून पाहायला मिळेल.
तसेच आपल्याच मातीतील कलाकारांचा हा जबरदस्त अभिनय पाहत असतानाच रसिक प्रेक्षक मनोरंजनाबरोबरच अनेक महत्वाच्या ठिकाणी विचार करण्यास प्रवृत्त होतील असा महत्वाचा विषय या नाट्यकृतीत आहे. आजपर्यंत मी दहा नाटकांचे लेखन केले. त्यामधील हे नाटक अतिशय महत्वाच्या विषयावर आहे,असे नाटक रसिक प्रक्षेकांनी आवर्जून पाहण्यासाठी उपस्थित रहावे,आपल्याच मातीतील आपल्याच कलाकारांच्या कलाकृतीला आपले प्रोत्साहन महत्वाचे आहे असे मत नाट्य – लेखक दिग्दर्शक सचिन शितप यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम निर्मिती /आयोजक हनुमान सेवा मंडळ, श्री देव हनुमान मंदिर मु.पो.खालगाव मधली गोताडवाडी यांच्या माध्यमातून नाट्यकलाकृती पाहण्यासाठी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी श्री.हनुमान मंदिर रंगमंच, खालगाव मधली गोताडवाडी ता.जि.रत्नागिरी येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.



