रत्नागिरी

देवरूखात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न

देवरुख दि. १९ (सुरेश सप्रे) :-   चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९४८ (युगाब्द ५१२४) निमित्त गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली.

या शोभायात्रेला सायंकाळी ६.०० वाजता सोलजाई ग्राम देवी मंदिर येथून प्रारंभ झाला. ग्रामदेवता देवी मंदिर येथून सुरू झालेली ही भव्य यात्रा दत्त मंदीरो. माणिक चौक. एसटी स्थानक, छत्रपती शिवाजी चौक मार्ग विठ्ठल मंदीर अशी पार पडली. यात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक, ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज, भगवे फेटे, टोप्या परिधान करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

यात्रेत सर्वत्र “जय श्रीराम” वंदे मातरम ” भारतमाता की जय’च्या घोषणांनी परीसर दूमदूमला. या यात्रेचे आयोजन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, देवरूख यांच्या वतीने करण्यात आले होते. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिस्तबद्ध सहभाग यामुळे ही स्वागत यात्रा अत्यंत यशस्वी ठरली असून, नववर्षाच्या स्वागताला एक वेगळाच उत्साह लाभला. देवरुख पोलीसांनी वाहतूक ठप्प होणार नाही याची दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button