श्री विठ्ठल मंदिर आवारात श्री स्वामी समर्थ मंदिरात शुक्रवारी प्रकट दिन कार्यक्रम

रत्नागिरी दि. १८ : शहरातील श्री. विठ्ठल मंदिर आवारातील श्री स्वामी समर्थ मंदिरात शुक्रवारी २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता स्वामींची प्रात समृद्ध पूजा होणार आहे. या पूजेकरिता यजमान म्हणून ज्येष्ठ स्वामी भक्त गजेंद्र पाथरे यांच्या शुभहस्ते पूजा होणार आहे. सकाळी ८.३० पासून स्वामींच्या अभिषेकाला सुरुवात होणार आहे. दुपारी १२.३० वाजता महाआरती होणार आहे
त्यानंतर दुपारी ३.०० वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जाणार आहे. दुपारी ३ ते ७ या वेळेत विविध भजने ,अभंग गायन अशी सेवा केली जाणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता आरती होणार आहे. त्यानंतर रात्री ९.०० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
सर्व स्वामी भक्तांनी शुक्रवारी स्वामींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ भक्त मंड, श्री विठ्ठल मंदिर संस्था यांच्याकडून करण्यात आले आहे.



