रत्नागिरी

पोदार प्रेप शाळेतर्फे आनंद नगर उद्याना मध्ये मुलांसाठी चित्रकला प्रदर्शन आणि कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी दि. ६ :- येथील शहरानजिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल येथील पोदार प्रेप ह्या शाळेतर्फे शहरातील उद्याना मध्ये येणाऱ्या बालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते व शाळेतील शिक्षिका विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती देत होत्या.

यामध्ये गोंद चित्र, भिल चित्र, वारली पेंटिंग, हेनरी मतिझ, वान बॉग, स्टॅरी नाईट, सनफ्लॉवर पेंटिंग इत्यादी चित्र प्रकारांचे प्रदर्शन आणि कार्यशाळा घेतली गेली.

शहरातील मुले या ठिकाणी आली असताना हि कार्यशाळा उद्यानामध्ये घेतली गेली.विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button