क्रीडामहाराष्ट्ररत्नागिरी

बास्केटबॉलमध्ये १६ वर्षीय मुलींमध्ये कोल्हापूर तर मुलांमध्ये सातारा प्रथम 

संगमेश्वर दि. १ ( प्रतिनिधी ) :- चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या स्पर्धांमध्ये रविवारी बास्केटबॉलमध्ये १६ वर्षीय मुलींमध्ये कोल्हापूरच्या वारणा क्लबने तर याच वयोगटातील मुलांमध्ये साताऱ्याच्या एन.बी. हुप्सने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्याच फ्लाय बास्केटबॉलने १६ वर्षीय मुलींमध्ये व मुलांमध्ये कोल्हापूरच्या घुणकी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच १४ वर्षीय मुलींमध्ये पुणे येथील जेएसपीएम ब्लॉसम हायस्कूलने तर मुलांमध्ये साताऱ्याच्या एन.बी. हुप्सने प्रथम क्रमांक मिळवला तर याच १४ वर्षीय वयोगटातील साताऱ्याच्या एन.बी.हुप्सने मुलींमध्ये व मुलांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button