रत्नागिरी

विश्व समता कला मंच लोवले संस्थेकडून जुनियर कॅरमपटू द्रोण हजारे याला प्रेरणा पुरस्कार जाहीर

देवरूख दि. १ :-  विश्व समता कला मंच लोवले या संस्थेतर्फे दिला जाणारा विश्व समता प्रेरणा गौरव पुरस्कार पी. एस बने इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी द्रोण मोहन हजारे याला जाहीर झाला आहे.

द्रोण हजारे हा देश वराज्य पातळीवरील जुनियर कॅरमपटू आहे. त्याने राज्यातील विविध स्पर्धामधे अनेक विजेतेपद पटकाविली आहेत. आजपर्यंत त्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत. आता या संस्थेच्या पुरस्काराची भर पडली आहे.

द्रोण हा जून्याकाळातील कॅरमपटू व कँरम संघटनेचे पदाधिकारी मोहन हजारे यांचा सुपुत्र आहे. प्रेरणा पुरस्कार मिळालेबद्दल द्रोण याचे महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आम. सुभाष बने व बने स्कूलचे संचालक रोहन बने, जिल्हा कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी सुरेंद्र देसाई, दिलिप विंचू, दत्ता नार्वेकर, कॅरम पटू राहुल भस्मे आदिंनी अभिनंदन केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button