रत्नागिरी

देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे आविष्कार संशोधन स्पर्धेत यश

रत्नागिरी दि. २२ : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या २० व्या विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेच्या अंतिम फेरीत यश संपादन केले. चर्चगेट, मुंबई येथील विद्यापीठ विद्यार्थी भवनात ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयाच्या अनुष्का नागवेकर (द्वितीय वर्ष विज्ञान शाखा) व संगिता कांबळे (प्रथम वर्ष विज्ञान शाखा) या विद्यार्थिनींनी नैसर्गिक आणि कृत्रिम निर्देशकांचा तुलनात्मक अभ्यास हा प्रकल्प सादर केला. त्यांना प्रा. आसावरी मयेकर यांनी मार्गदर्शन केले. हा प्रकल्प चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. या अंतिम फेरीमध्ये १६ महाविद्यालयांचा सहभाग होता. स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या आविष्कार रिसर्च समितीच्या सदस्य प्रा. मयेकर उपस्थित होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव व आविष्कार संशोधन समिती प्रमुख प्रा. सानिका कीर यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button