रत्नागिरी

सावर्डे पोलीस ठाण्याची धडक कारवाई; अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एका इसमास घेतले ताब्यात

चिपळूण दि. २५ :- सावर्डे पोलीस ठाण्याची धडक कारवाई करत अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एका इसमास  ताब्यात घेतले असून, जवळपास पावणे सहा लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध मद्य वाहतुकीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे सावर्डे पोलीस ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. आबासाहेब पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 24/02/2026 रोजी सावर्डे पोलीस ठाण्याच्या पथकाला एक इसम मुंबई-गोवा महामार्गावरुन आपले वाहनातून गोवा बनावटीचे विदेशी मद्य वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

प्राप्त माहितीच्या आधारे सावर्डे पोलीस ठाण्यातील स्टाफ सह मुंबई-गोवा महामार्गावरील वहाळ फाटा उड्डाण पुलावर 12.30 वाजण्याच्या सुमारास सापळा रचुन सदर संशयित वाहन थांबवून ₹1,86,720/-किमतीचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य व ₹4,00,000/- किमतीची एक क्रेटा गाडी (GA-08-AN-3004) असा एकूण ₹5,86,720/- किमतीचा मुद्दे माल ताब्यात घेण्यात आला.

या वाहनावरील चालक समुंदर सिंग श्यामसिंग राठोड, वय 24, रा. मधलावाडा, आरंबूल, पेडणे, गोवा व मूळ रा. रावला वाला, रेहका की ढाणी, उम्काली, कुलथाना, जि. पाली, रा. राजस्थान यास ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईमध्ये एकूण ₹5,86,720/- किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आलेला आहे तसेच चालक समुंदर सिंग श्यामसिंग राठोड, वय 24, रा. मधलावाडा, आरंबूल, पेडणे, गोवा, व मूळ रा. रावला वाला, रेहका की ढाणी, उम्काली, कुलथाना, जि. पाली, रा. राजस्थान याच्या विरुद्ध सावर्डे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 16/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही, कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे पोलीस ठाणे, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. आबासाहेब पाटील व पोहवा / पटेकर, पोहवा / कांबळे, पोहवा / पालकर, पो.शि/ चोचे या पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button