रत्नागिरी

श्रीदेव भैरी शिमगोत्सव कार्यक्रमाची रुपरेषा

रत्नागिरी दि. २२ :- श्रीदेव भैरी शिमगोत्सव कार्यक्रम २०२६ निश्चित करण्यासाठी रविवारी श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्ट, झाडगांव, रत्नागिरीचे अध्यक्ष- रविंद्र तथा मुन्ना प्रभाकर सुर्वे यांचे उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत श्रीदेव भैरी शिमगोत्सव कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली.

सोमवार दि. ०२/०३/२०२६ (फाल्गुन पौर्णिमा) रोजी रात्रौ १० वा. सहाणेवरुन श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपारिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्रो ठिक ११ वाजेपर्यंत जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदीरा बाहेर पडेल व खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाईल.

मंगळवार दि. ०३/०३/२०२६

श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरुन झाडगांव नाका, टिळक आळी, कॉग्रेस भूवन, मुरलीधर मंदीर, बंदर रोड मार्गे पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चंवडे वठार, खडपे वठार मागील समुद्र मार्गाने जावून पुढे शेटये यांचे घराजवळ रस्त्यावर येवून खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता येईल. तेथून तेली आळी भागातून, राम नाका, राम मंदिर येथे सकाळी ११.३० वाजता येईल. तेथून पुढे बारा वाडयांच्या वतीने राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी १२ वाजता येईल तेथून पुढे गोखले नाक्यावरुन गाडी तळावरुन सहाणेजवळून, घसरवाटेवरुन मुरुवाडयातील २०नं शाळेच्या मागे श्री शिवलकर यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा घेऊन दुपारी ३ वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जावून तेथे होळी उभी केली जाईल.

रात्रौ ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरुन निघेल व सांवतखोत वठारातून पटवर्धन यांच्या घरापर्यंत जावून फिरुन येईल व देवस्थानचे मुख्य खोत श्री. रमाकांत गोपाळ सांवत व श्री. संतोष आत्माराम सांवत यांच्या घरी जाईल तेथे पुजा अर्चा होऊन धुळवड श्रीदेवी जोगेश्वरी मंदीरात जाईल. तेथून सहाणेच्या मागील बाजूने सांवत खोतांच्या मूळ चौकीवर जाऊन सुर्वे यांच्या बागेतून शिवलकर वगैरे यांच्या घराजवळून कुभांरवाडयातून परटवणे फगरवठार येथून परत फिरुन निशाण वरच्या आळीतून, लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालनिच्या पारावर येईल सुमारे रात्रो ११.३० वा. ढमालनिच्या पारावरुन निशाणाचे तीन भाग होतील त्यापैकी एक भाग निशाण घेवून गुरव मंडळी श्रीदेव भैरी मंदिरामध्ये जातील. दुसरा भाग गोखले नाक्यावरुन राधाकृष्ण नाक्यावरुन मासळी बाजारापेठ येथे जाईल, तेथे सुर्वे बोळातून, मयेकर यांचे घराच्या दरम्यान फिरुन मच्छीमार्केटच्या मागील बाजूने झारणी रोड मार्गे राम नाक्यावरुन तेली आळीत रसाळ यांचे घरी तिटयावरती येईल. ढमालणीच्या पारावरुन तिसरा भाग निघून प-याची आळी, मारुती आळीतून तेली आळी येथील श्री रसाळ यांचे घरी तिटयावर येईल. तेथून गोडीबाव नाक्यावरुन श्री देसाई यांचे घरी जावून, खडपेवठार येथे श्री देसाई व श्री. विलणकर यांचे शेतातून कै. रघू विलणकर यांचे घरी जाईल तेथून निशाण राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात जाईल (सुमारे १.३० वा.) तेथे श्रीदेव विश्वेश्वराच्या हीत फिरुन श्रीदेव विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गा-हाणे होईल व निशान बाहेर पडेल तेथून राजीवडयातील चव्हाण यांच्या घराशेजारी जाईल. तेथे मुस्लीम मानकरी श्री. काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देवून गळाभेट होईल व तेथे धुळवड साजरी होईल. तेथून निशाण परत फिरुन खडपेवठार सतीजवळून, चंवडे वठार नाक्यावरुन, विलणकरवाडी, श्रीदत्त मंदिर नाका, घुडे वठार, मांडवी येथे श्री. वारंग यांचे घरी रात्री थांबेल.

बुधवार दि. ०४/०३/२०२६

सकाळी ८ वाजता मांडवी वारंग यांचे घरापासून पुढे सदानंदवाडी समुद्रमार्गे पौडा वरुन कुरणवाडी, सिध्देश्वर विरेश्वर चव्हाट्याजवळ गा-हाणे होईल. तेथून धुळवड श्री आबूलकर यांच्या घरी जाईल. आंबूलकर यांच्या घरातून सांबमंदिर, जोतीबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होवून एक भाग राममंदिरच्या मागील बाजूने जावून दुसरा भाग राममंदिराच्या पुढिल बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येवून तेथून पुढे भैरी मंदिर, सुभेदार यांच्या घराजवळून पिलणकर फिशरीज फॅक्टरी जवळून विठलादेवी जवळून ग्रामस्थ श्री. शिरधनकर यांच्या घरी जाईल. तेथून मुरुगवाडा घसरवाटेजवळ धुळवडीचे दोन भाग होतील. एक भाग झाडगाव येथील झाडगावकरांच्या कंपाऊंडमध्ये येईल व दुसरा भाग तेथून पुढे पंधरा माड येथील श्री. पिलणकर यांच्या घरी जाईल. नंतर मुरुगवाडा हद्दीजवळ जावून तेथे गा-हाणे होवून धुळवड परत मागे फिरुन झाडगांव सहाणेजवळील सांवतखोत यांच्या मूळ चौकीवर दुपारी १२ वाजता येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल.

बुधवार दि. ०४/०३/२०२६ ते ०७/०३/२०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीदेव भैरी ची पालखी झाडगांव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल.

तसेच दि. ०४/०३/२०२६ ते ०७/०३/२०२६ च्या रात्री १० ते १२ वाजेपर्यंत प्रत्येक वाडी तर्फे पारंपारिक पध्दतीत पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.

शनिवार दि. ०७.०३.२०२६

रोजी दु. १२.०० वा. श्रीदेव भैरीची पालखी मुरुगवाडयात ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरुन उठेल व झाडगाव मार्गे, श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर येथून खालची आळी, भैरी मंदिर मार्गे पाटिल कंपनीचे मागिल बाजूने मुरुगवाडयातून पंधरा माडापर्यंत जावून परत मागे फिरेल व रात्रौ साधारण १०.०० वाजता झाडगाव सहाणेवर येईल, त्यानंतर सहाणेवर रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.

रविवार दि.०८.०३.२०२६ (फाल्गून पंचमी) (रंगपंचमी)

श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी १ वाजता सहाणेवरुन उठेल व पोलिस कर्मचा-यांची शस्त्र सलामी घेवून वरच्या खोत वठारातून झाडगाव श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून खेडसकर सांवत कंपाऊड मधून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरुन खालच्या खोत वठारातून ३.०० वाजता झाडगाव नाक्यावर येईल तेथून पुढे गाडीतळ येथे ४.०० वाजेपर्यत येईल, पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात सांय. ५.०० वाजता पोहचेल. तेथून पुढे शहर पोलीस स्टेशनला पोहचेल, पुढे धनजी नाक्यावरून, राधाकृष्ण नाक्यावर सांय.०६.३० वा. येईल. पुढे राम नाका, राम मंदिर येथे सांय ०७ वा. येईल, पुढे मारुती आळी, गोखले नाक्यावरून, ढमालनीच्या पारावर रात्रौ ९ वाजता पालखी येईल. तेथून पुढे विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, कॉग्रेस भूवन, मुरलीधर मंदिर येथे रात्रौ १० वाजता पालखी येईल, पुढे खालची आळी मार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रागंणात रात्रौ ११.३० वाजेपर्यत येईल. रात्रौ १२ वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल, नंतर धुपारत व गावाचे गाहाणे होवून शिमगा उत्सवाची सांगता होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button