रत्नागिरी
दानशुर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुर्णाकृती पुतळा स्मारकाचा लोकार्पण सोहळा

रत्नागिरी दि. २२ :- रत्नागिरीतील पतित पावन मंदिर, भागेश्वर मंदिर, गोशाळा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत मोलाचा वाटा उचललणारे नररत्न श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुर्णाकृती पुतळा असलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला.
भंडारी समाजाचे श्रध्दास्थान असलेले भागोजीशेठ कीर यांचा भव्य पुतळा उभारण्याचा भंडारी समाजाला दिलेला शब्द पाळत, व्यवसाय आणि दानशूरतेने रत्नागिरी शहराचा नावलौकिक वाढविणा-या श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या कार्याचे स्मरण करुन देण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत एक प्रेरणादायी वारसा पोहचवेल असा मला विश्वास आहे, असे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.



