रत्नागिरी

जाकादेवी येथे धम्म क्रांती कला मंचातर्फे माता रमाईं आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

विल्ये दि. १४ (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुका धम्मक्रांती कला मंचातर्फे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी तालुक्यातील विविध शाखांमधून सुमारे २० पेक्षा जास्त जलसाकार ग्रुप तसेच काही वैयक्तिक कलाकारांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर सुमधूर वाद्यांच्या तालावर अतिशय प्रेरणादायी काव्य गीत गायन करून माता रमाई आंबेडकर यांना वंदन करण्याचा विशेष कार्यक्रम जाकादेवी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

सदरचा कार्यक्रम कला मंचाचे उपक्रमशील अध्यक्ष,कवी-गायक- संगितकार रविकांत सोनू पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कला मंचाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, जेष्ठ सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रा. पवार, भगवान जाधव, अनिल पवार, श्री.पवार, कवियत्री ज्योती पवार, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या राजश्री कांबळे, खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, कला मंचाचे सचिव सतिश कदम ,उपसचिव प्रशांत जाधव ,संदीप जाधव, कार्याध्यक्ष मिलिंद कांबळे, प्रशांत मोहिते , गौतम सावंत,उमेश मोहिते,पत्रकार संतोष पवार, संभाजी भोसले यांसह तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कवी, गायक, संगीतकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार,संदीप जाधव,प्रशांत मोहिते यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व दीपप्रज्वलन करणे करण्यात आले.

तसेच हा कार्यक्रम रविकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमात पुरुषांसह महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.यावेळी धम्म क्रांती कला मंचातर्फे रत्नागिरी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीत विविध कलेच्या माध्यमातून धम्म चळवळीचे निष्ठावंत प्रचारक व प्रसारक असलेल्या नावलौकिक ज्येष्ठ कलाकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील कालकथित कलाकारांच्या कार्याचे स्मरण करून मरणोत्तर सन्मानपत्र त्यांच्या कुटुंबियांना आदरपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

माता रमाई जयंती निमित्त कला मंचाचे अध्यक्ष रविकांत पवार यांच्यासह निवडक मान्यवरांनी माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून अनेकांनी कला मंचाच्या दूरदृष्टीचे व कलाकारांना नव्याने उभारी देण्याच्या संकल्पनेचे कौतुक केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मक्रांती कला मंचाचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, संघटक ,जाकादेवी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, देणगीदार यांनी मोलाचे सहकार्य केले.

विविध गावातील जलसाकार मंडळाना या कार्यक्रम आयोजनातून नव्याने उभारी मिळत असून नव चैतन्य निर्माण झाल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवर मंडळी देणगीदारांचे तसेच कलाकार मंडळींचे तालुकाध्यक्ष रविकांत पवार यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button