
रत्नागिरी दि. १४ :- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने १९ वी जिल्हास्तरीय खुली तायक्वॉंदो स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल मारुती मंदिर येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धा मध्ये सिध्दाई तायक्वाँडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोलीचा खेळाडू कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे याने कांस्यपदक पदक संपादन केले आहेत.
तसेच प्रद्युम्नला दापोली तालुका प्रमुख महिला प्रशिक्षिका सौ. प्रिती दाभोळे व दापोली तालुका प्रमुख प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय तायक्वॉंडो खेळाडू श्री. प्रथमेश दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
पदक विजेता प्रद्युम्न व प्रशिक्षक यांचे भाजपा मा. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. केदारजी साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तसेच जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, आणि भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.जया साळवी, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. वैष्णवी वेल्हाळ, श्री.प्रदिप दाभोळे,श्री. विष्णू गोडसे, सौ. अक्षता दरेकर तसेच सिध्दाई तायक्वाँडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली सहसचिव श्री. महेश्वर जाधव, कोषाध्यक्षा सौ. श्रध्दा दाभोळे , सदस्य श्री. शैलेश मिसाळ व श्री. मंगेश गोडसे आणि समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



