रत्नागिरी

वाटद रत्नागिरी येथील संदीप सोनुजी जाधव यांचा ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्काराने उद्या होणार सन्मान

विल्ये दि. १३ :- रत्नागिरीतील वाटद गावचे सुपुत्र संदीप सोनुजी जाधव यांना नालंदा ऑर्गनायजेशन महाराष्ट्र शासन सारंग सोसायटी सहकार नगर,पुणे मार्फत आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संदीप सोनुजी जाधव, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जांभारी, ता.जि. रत्नागिरी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनीय वर्षाव होत आहे.

सदर पुरस्कार नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेच्या माध्यमातून ग्राम समृद्धी सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन नवी पेठ,पुणे येथे करण्यात आले आहे.संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात संदीप जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

संदीप सोनुजी जाधव एक अभ्यासू आणि अविरत कार्यतत्पर असणारं व्यक्तिमत्व जे अनेकांना प्रोत्साहन आणि प्रेरणादायी आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक, धार्मिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्व तसेच शासकीय अधिकारी म्हणून ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना,नागरिक, उद्योजक, व्यापारी यांना शासनामार्फत विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी करणे तसेच शासकीय विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबविणे, देशभक्तीपर व राष्ट्रीय महामानवांच्या जीवनावर क्रांतिकारक गीते गाण्याचा छंद तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये बौद्धाचार्य, धम्म संस्कार समितीचे सदस्य, धम्मक्रांती कला मंचाचे सहसचिव,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे सदस्य अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणून मा.संदीप जाधव सर सर्वत्र परिचित आहेत.त्यांना आदर्श ग्राम पंचायत अधिकारी हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button