रत्नागिरी

चिपळूणला सर्वाधिक ६२.५६ तर सर्वात कमी मंडणगड ४८.७८ टक्के

जिल्हापरिषद/पंचायत समिती निवडणूक; ३ लाख १८ हजार ६६२ पुरुष तर ३ लाख ३६ हजार २८५ महिला मतदारांनी केले मतदान

रत्नागिरी, दि. ८ :- जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान झाले. जिल्ह्यात 3 लाख 18 हजार 662 पुरुष, 3 लाख 36 हजार 285 महिला तर इतर 2 अशा एकूण 6 लाख 54 हजार 949 मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात सरासरी 55.79 टक्के मतदान झाले. चिपळूणला सर्वाधिक 62.56 तर सर्वात कमी मंडणगड तालुक्यात 48.79 टक्के मतदान झाले. सर्वाधिक पुरुष व महिला मतदान रत्नागिरी तालुक्यात झाले. जिल्ह्यात शांततेत व सुरळीतपणे मतदान पार पडले.

उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी तयारी सुरू झाली आहे.

तालुक्याचे नाव, पुरुष मतदान, महिला मतदान, एकूण मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे-

मंडणगड – पुरुष 13059, महिला 13830, एकूण मतदान 26889. 48.79 टक्के

दापोली – पुरुष 35636, महिला 40079 एकूण मतदान 75715, 53.87 टक्के

खेड – पुरुष 39454, महिला 39584 एकूण मतदान 79038, 56.89 टक्के

चिपळूण- पुरुष 57982, महिला 56915 एकूण मतदान 114897, 62.56 टक्के

गुहागर – पुरुष 24304, महिला 30428 एकूण मतदान 54732, 56.52 टक्के

रत्नागिरी – पुरुष 59064, महिला 60614, इतर 2, एकूण मतदान 119680, 58.52 टक्के

संगमेश्वर – पुरुष 42100, महिला 43902 एकूण मतदान 86002, 53.85 टक्के.

लांजा – पुरुष 18343, महिला 19461 एकूण मतदान 37804, 51.16 टक्के.

राजापूर – पुरुष 28720, महिला 31472 एकूण मतदान 60192, 49.87 टक्के.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button