क्रीडारत्नागिरी

रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण आंतरराष्ट्रीय ओपन कॅरम स्पर्धेचा उपविजेता

रत्नागिरी दि. ५ :- नुकत्याच दादर मुंबई येथे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा खेळाडू अभिषेक चव्हाण याने संपूर्ण स्पर्धेत अत्यंत सर्वांग सुंदर खेळाचे प्रदर्शन करीत लागोपाठ तीन आंतरराष्ट्रीय विजेत्यांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

उप उप उपांत्य फेरीत माजी विश्व विजेता संदीप दिवे याचा 25-17, 6-22, 11-9 तर उप उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा बलाढय खेळाडू मोहम्मद घुफ्रान याचा 19-18, 21-23, 25-23 आणि उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशचा आक्रमक खेळाडू आरिफ मोहम्मद याचा 13-10, 15-17, 24-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम फेरीत माजी विश्व विजेता के. श्रीनिवासन विरुद्ध सामन्यात त्याने 1 ला सेट 20-9 जिंकून सुरुवात चांगली केली होती पण श्रीनिवासन याने आपला अनुभव पणाला लावून पुढील दोन्ही गेम्स 25-0, 25-4 असे जिंकून विजेतेपद मिळविले. श्रीनिवासन याला 1.5 लाख तर अभिषेक चव्हाण याला 1 लाख रुपये बक्षीस मिळाले.

या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, नितीन लिमये, सेक्रेटरी मिलिंद साप्ते, सल्लागार सुचय अण्णा रेडीज व रत्नागिरी तील सर्व कॅरम खेळाडूनी व कॅरम प्रेमीनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button