रत्नागिरी

रत्नागिरीचे पालकमंत्री  ना. उदय सामंत यांची पाली येथे पारंपरिक चिखल नांगरणी स्पर्धेला उपस्थिती

रत्नागिरी दि. २९ :- राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. उदय सामंत यांनी  पाली येथे अचानक नवरात्रौत्सव मित्रमंडळ, पाली आयोजित पारंपरिक चिखल नांगरणी स्पर्धेला उपस्थित उपस्थिती दर्शवली.

मातीशी नातं जपणारी आणि आपल्या शेती संस्कृतीची जिवंत परंपरा पुढे नेणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा, निसर्गाशी असलेल्या नात्याचा आणि आपल्या ग्रामीण वारशाचा सुंदर उत्सव आहे.

अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला कृषी परंपरेचं महत्त्व समजतं आणि शेती हा केवळ व्यवसाय नसून जीवनाचा आधार आहे, हे पुन्हा अधोरेखित होतं.

या उपक्रमासाठी सर्व आयोजक, शेतकरी बंधू आणि सहभागी स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले.

या प्रसंगी डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील, शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, सुदेशजी मयेकर यांसह मंडळाचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button