रत्नागिरी

वाटद खंडाळा दहावी- बारावी परीक्षा केंद्रावर ३२७ विद्यार्थी प्रविष्ट

जाकादेवी दि. २५ :- फेब्रुवारी -मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी, इयत्ता दहावी वाटद खंडाळा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू असून या केंद्रावर बारावी परीक्षेला १७५ विद्यार्थी तर दहावी परीक्षेला १५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा अतिशय शांततेत व सुरळीत सुरू झाली असून या केंद्रावर बारावी परीक्षा केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक शिवाजी जगताप तर केंद्राचे उपसंचालक म्हणून जयगड शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे काम पाहत आहेत. दहावी केंद्रावर केंद्र संचालक म्हणून प्रदीप वाघोदे तर केंद्र उपसंचालक म्हणून शिवाजी जगताप हे काम पाहत आहेत.

नियोजित परीक्षा शासकीय बोर्ड परीक्षा संहितेच्या आधारे कस्टोडीयन म्हणून रत्नागिरी शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे ,तर सहाय्यक कस्टोडीयन म्हणून खंडाळा येथील शिक्षक सुनिल कांबळे ,रामदास पालशेतकर अतिशय जबाबदारीने कार्यभार सांभाळत आहेत.

विविध केंद्रांवर परीक्षा यशस्वी करण्यासाठी रनर म्हणून संदखोलचे केंद्रप्रमुख अरविंद महाकाळ,जाकादेवीचे राहुल यादव,सैतवडेचे नितीन जाधव , मालगुंडचे मिलिंद सुर्वे, तसेच जयगडचे श्री.विवेकानंद शेंडगे ,आगरनरळचे सुखदेव गोडसे विल्ये हायस्कूलचे आशिष सावंत तर कर्मचारी म्हणून श्रीमती मंगला चावरे व श्री.विनायक कोळवणकर वाटद- खंडाळा कस्टडी ६७ या मुख्य केंद्राअंतर्गत कार्यरत आहेत.परीक्षा परिपुर्तीसाठी परिसरातील शाळांतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व केंद्रावरील सर्व स्टाफ मेहनत घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button