रत्नागिरी

उत्कर्ष सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित मोफत डोळे तपासणी उपक्रमाचा रत्नागिरीतील १०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

रत्नागिरी दि. ४ :- उत्कर्ष सेवाभावी संस्था आयोजित व इन्फिगो आय केअर यांच्या सौजन्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात रत्नागिरीतील १०० विद्यार्थांची तपासणी करण्यात आली.

या उपक्रमाचा शुभारंभ आज मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झाला.

यावेळी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर , नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेवक संदीप सुर्वे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, विश्वस्त गणेश सलीम, सामाजिक कार्यकर्ते संदीप रसाळ, इन्फिगो आय केअरचे ब्रांच मॅनेजर सुशांत पांचाळ, मार्केटिंग हेड मंगेश पावस्कर व शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमात रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव येथील शंभर विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button