रत्नागिरी

कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचा बजेट सेमिनार व पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी दि. २ : कर सल्लागार असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने रविवारी सकाळी हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे बजेट सेमिनार २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय अर्थसंकल्पीय सत्राचे थेट प्रक्षेपण सदस्यांसाठी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बजेट सत्रानंतर दुपारी वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ झाला.

सायबर सुरक्षा, समाजहित व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अक्षय फाटक यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्या सभासदांपैकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ. निशा आंबेकर व राजेंद्र भावे यांचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या पुरस्कार वितरणाचा मान वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट एच. एल. पटवर्धन यांच्या हस्ते झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. रमाकांत पाथरे, उपाध्यक्ष सीए अभिजीत पटवर्धन, खजिनदार सीए ऋषिकेश फडके उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव ॲड. रवींद्र साळवी व कार्यकारिणी सदस्य धनेश रायकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button