रत्नागिरी

संगमेश्वरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

संगमेश्वर दि. २ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील निवळी आसटवाडी येथील २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत तरुणीचे नाव सानिका संजय घडशी (वय २० वर्षे, रा. निवळी आसटवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आहे. सदर घटना दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० ते सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये घडली. सानिका हिने घरातील बेडरूमच्या लाकडी भाल्याला गुलाबी रंगाच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या घटनेची खबर भिकाजी रत्नु घडशी (वय ९० वर्षे, व्यवसाय शेती, रा. निवळी आसटवाडी) यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून २ फेब्रुवारी रोजी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अकस्मात मृत्यूचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकारी, देवरूख यांच्याकडे पाठविण्यात आला असून, पुढील तपास पोहेकाँ/४६५ यु.एम. सासवे हे संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने करीत आहेत.आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button