कोकण नगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या बांधकामांवर बुलडोझर!

रत्नागिरी दि. २३ : रत्नागिरी नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम कोकण नगर भागातून हाती घेतली आहे. कोकण नगर येथील जवळपास १०० अतिक्रमणे हटवली जाणार असून, रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी बुलडोझर फिरवण्यात आला.
नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेताच शिल्पा सुर्वे यांनी ही धडक कारवाई सुरू केली आहे. चाररस्ता ते विमानतळाकडे जाणारा रस्ता 30 मीटरचा मंजूर असून या रस्त्यावर जवळपास १०० ते १२५ अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. क्रांतीनगरपर्यंत असणारी ही सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत. शुक्रवारपासून अतिक्रम हटाव मोहीम नगर परिषदेने सुरू केली आहे.
संपूर्ण रत्नागिरी शहरातील अनधिकृत बांधकामे लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे नगराध्यकास शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल शहरवासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



