क्रीडारत्नागिरी

शिवशंभो क्रिकेट क्लब देऊड आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत डीसीसी विल्ये संघ विजयी

विल्ये दि. २३ :- रत्नागिरी तालुक्यातील देऊड येथे नुकताच झालेल्या शिवशंभो क्रिकेट क्लब देऊड आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत डी.सी.सी विल्ये संघाने बाळ गोपाळ तरवळ संघावर मात करून विजय प्राप्त केला.

शिवशंभो क्रिकेट क्लब देऊड ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात पोहोचलेल्या डी.सी.सी विल्ये आणि बाळ गोपाळ तरवळ यांच्या झालेल्या लढतीमध्ये प्रथम बाळगोपाळ तरवळ संघाने फलंदाजी घेऊन १८ चेंडूत ४७ धावा केल्या, आणि डीसीसी विल्ये संघाने प्रतिउत्तर लक्ष्य पार करताना जलद गतीने १३ चेंडू मध्ये ४७ धावां पुर्ण करून सामना जिंकला.या अंतिम सामन्यात विल्ये डि.सी.सी संघाने चषकावर आपले नाव कोरले.

विजेता संघाला ट्रॉफी आणि ₹- ६६६६ रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले,आणि उपविजेत्या बाळ गोपाळ तरवळ संघाला ट्रॉफी आणि ₹- ४४४४ रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.सदर विजेता डीसीसी विल्ये संघातील विशेष प्रभावी कामगिरी करणारे हर्ष कांबळे यांनी गोलंदाजी करताना ६ चेंडूत फक्त २ धावा दिल्या. तसेच फलंदाजी मध्ये यश कांबळे आणि विल्ये जाकादेवी पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध फलंदाज संकेत कांबळे या जोडीने नाबाद राहून सामना जिंकला.

सामन्यात डीसीसी विल्ये संघाचा बेस्ट बॉलर- हर्ष कांबळे आणि बाळ गोपाळ तरवळ संघाचा बेस्ट बॅट्समन सिद्धेश कुळ्ये यांची खेळी लक्षवेधी ठरली. त्यांच्या प्रभावी खेळीसाठी त्यांचाही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. विजेत्या झालेल्या डीसीसी विल्ये संघाचे कर्णधार प्रेम कांबळे यांनी विजयाचे पूर्ण श्रेय आपल्या संघाला देऊन पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button