रत्नागिरी

गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांची कारंबेळे शेवरवाडी शाळेला भेट

शालेय कामाकाजाबाबत समाधान

संगमेश्वर दि. १५ ( प्रतिनिधी ):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंबेळे शेवरवाडी येथे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी आकस्मित भेट दिली.

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेविषयी काही प्रश्न विचारून गटशिक्षणाधिकारी यांनी चाचपणी केली. मुलानी चांगला प्रतिसाद दिला. शालेय कामकाजा विषयी गटशिक्षणाधिकारी यांनी चांगली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत समीर काब्दुले यांचीही उपस्थिती होती.प्रशालेच्या मुख्याध्यापक वेदिका पराडकर, शिक्षण सेवक सुप्रिया देसाई यांनी गटशिक्षणाधिकारी विजय परीट आणि समीर काब्दुले यांचे ग्रंथ देवून स्वागत केले.

यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी विजय परीट म्हणाले की, या शाळेचा भाग जरी दुर्गम असला तरीही निसर्गाच्या सान्नीध्यात आहे. शाळेच्या भिंती जशा बोलक्या आहेत, तशी येथील मुलं देखील बोलकी आणि हुशार असल्याचे नमूद करुन परीट यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. आपण परत या शाळेत जरुर भेट देवू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button