रत्नागिरी

अभिरुच्या “स्वरोत्सव २०२६” संगीत महोत्सवात मानस कुमार यांच्या व्हायोलिन वादनाने श्रोते मंत्रमुग्ध

देवरुख दि. ११ :- अभिरुची देवरुख आयोजित “स्वरोत्सव २०२६” या वार्षिक संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची मैफिल पं. विद्युत मिश्रा यांचे पट्टशिष्य असलेले सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मनास कुमार यांच्या व्हायोलिन वादनाने संपन्न झाली.

या वाद्य वादानाच्या मैफिली ग्रामीण भागात क्वचितच ऐकायला मिळत असल्याने देवरुख परिसरातील वाद्यसंगीत रसिकांना हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वाणीच ठरला.

आपल्या सुरेल व्हायोलिन वादनाने मानस कुमार यांनी राग यमन. त्रीतालात. झिंझोटी यासह रसिकमान्यता मिळालेल्या काही रचना सादर केल्या मैफिलीच्या सांगतेला त्यांनी दक्षिण हिंदुस्तानी संगीतावर आधारित एक भैरवीतील रचना सादर केली. व कार्यक्रमाची सांगता केली.

स्वरोत्सव २०२६ ची दुसरी मैफिलही दिमाखात साजरी झाली. तसेच एका आगळ्या वेगळ्या वाद्यसंगीत मैफिलीचा आस्वाद रसिकांनी घेतला.

आज रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी तपस्या या सावंतवाडी येथील संगीत – नाट्य संस्थेच्या कलाकारांनी

साकारलेले कै. चि . य. मराठे लिखित आणि पं. भालचंद्र पेंढारकर यांचे मूळ संगीत असलेले “होनाजी बाळा” हे संगीत नाटक सादर होणार आहे. आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button