रत्नागिरी

देव घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक हिंदी दिनानिमित्त “युवा रंग हिंदी संग” या कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी दि. १० : भारत शिक्षण मंडल देव घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिंदी दिनानिमित्त “युवा रंग हिंदी संग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर हिंदी विभागप्रमुख सहायक प्राध्यापिका प्रियांका कुंभार यांनी प्रास्ताविक भाषणातून जागतिक हिंदी दिनाचे महत्त्व सांगत हिंदी साहित्यिकांची माहिती दिली तसेच जागतिक स्तरावर हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.

जागतिक हिंदी दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी नाटक, एकपात्री प्रयोग व गीतांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर हिंदी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे सादर केले.

या आयोजनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांना प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्तीची संधी देणे तसेच हिंदी साहित्य व संस्कृतीबद्दल आवड निर्माण करणे हा होता.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. मधुरा पाटील यांनी आपल्या दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

या जागतिक हिंदी दिनाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. मधुरा पाटील, उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, IQAC विभागप्रमुख प्रा. राखी साळगांवकर, कला विभागप्रमुख प्रा. ऋतूजा भोवड, हिंदी विभागप्रमुख प्रा. प्रियांका कुंभार तसेच इतर प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलाक्षी राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन तन्वी भाटकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button