राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत उघडले खाते
निकालाआधीच भाजपाचे दोन उमेदवार विजयी; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या यांच्या विशेष प्रयत्नांना यश

मुंबई दि. ३१ :– राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत खाते उघडले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत निकालाआधीच भाजपाचे दोन उमेदवार विजयी झाले असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या यांच्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे.
भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली असून, रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची भाजपाची अधिकृत प्रतिक्रिया आहे.
भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत.कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक १८ अ मधून बिनविरोध निवड झाली असून, कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने खाते उघडले आहे.
प्रभाग क्रमांक १८ अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याशिवाय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ क मधून भाजपाच्या उमेदवार सौ. आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.



