रत्नागिरी

भडकंबा येथे साने गुरुजी यांची १२६ वी जयंती साजरी

संगमेश्वर दि. ३१ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथे साने गुरुजी सेवा मंडळाच्या वतीने साने गुरुजींची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. गेली अनेक वर्षे जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण डिसेंबर महिन्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवार व रविवारी बौद्धिक व मैदानी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धामध्ये वक्तृत्व, निबंध लेखन, कथाकथन, हस्ताक्षर, संगीत खुर्ची,चमचा गोटी, पाठांतर, स्मरण शक्ती आदी स्पर्धा घेण्यात आल्या

या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थांचा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डी कॅड कॉलेज देवरुखचे प्राचार्य रणजित मराठे,यांनी ओघावत्या वाणीने विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे गुण आत्मसात करून आपले भविष्य उज्वल करण्याचे आवाहन केले. मात्र त्यासाठी आईने आपले सर्वोत्तम योगदान द्यावे यावेळी रमाकांत शिंदे, मधू आठल्ये,ग्रामपंचायत सदस्य केतन दुधाने, माजी उपसरपंच बापू शिंदे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मनाली कनवाजे, यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. साने गुरुजींच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा व तसे त्यांच्यावर संस्कार व्हावे यासाठी आमचे सतत प्रयत्न यापुढेही सुरु राहतील यासाठी भडकंबावासी निश्चितच पाठीशी राहतील असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी कै.आत्माराम शिंदे चंद्रकांत जामसंडेकर व साने गुरुजी यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. माझ्या वडिलांच्या काळात सुरु असलेले कार्य यापुढेही सुरु राहील याची ग्वाही कै चंद्रकांत जामसांडेकर यांचे चिरंजीव बाळू जामसंडेकर यांनी दिली. यावेळी गणपत शिर्के शंकर, नवाले, अनंत शिंदे, डॉ सुनील आठल्ये, गोपी वाघधरे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र दुधाने, बबलू शिर्के, बंड्या केळकर, नंदू कनावाजे, बहुसंख्य महिला विद्यार्थी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button