
रत्नागिरी दि. ४ :- कराटे असोसिएशन रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी या जिल्हा संघटने मार्फत 28 ते 30 एप्रिल 2026 तीन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिर बॅडमिंटन हॉल क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर रत्नागिरी येथे घेण्यात आले.
सदर समर कॅम्प मध्ये मिरकर मार्शल आर्ट अकॅडमी व ए. बी.स्पोर्ट्स अकॅडमी, रत्नागिरी यांच्या कराटे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये 30 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना कराटे स्पर्धेमध्ये आवश्यक असणारे काता व फाईटचे तंत्रशुद्ध कराटे प्रशिक्षण मुंबईहून आलेले राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक अविनाश मोरे व प्रसाद सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारचे कराटे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच काता प्रकारामध्ये वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या नवीन नियमावलींचे मार्गदर्शन देण्यात आले तसेच फाईटसाठी आवश्यक असणारे टेक्निक विद्यार्थ्यांना देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील कराटे खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी कराटे असोसिएशन रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी ही जिल्हा संघटना नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबवत असते.
सदर संघटनेला संलग्न असलेल्या रत्नागिरीतील मिरकर मार्शल आर्ट अकॅडमी व ए.बी. स्पोर्ट्स अकॅडमी नेहमीच कार्यरत असते या अकॅडमीचे कराटे प्रशिक्षक जावेद ह. मिरकर, व कराटे प्रशिक्षक अरुण जु. बेग विद्यार्थ्यांना कराटे खेळामध्ये कशाप्रकारे पुढे घेऊन जाता येईल यासाठी नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी आयोजित केलेल्या समर कॅम्प मुळे मुलांना पुढील होणाऱ्या शालेय व संघटनात्मक कराटे स्पर्धेमध्ये भरपूर फायदा होईल व हे विद्यार्थी आपलं व जिल्ह्याचे नाव कराटे स्पर्धेमध्ये उज्वल करतील.
कराटे संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या शिबिरासाठी पालकांनी आपल्या पाल्याला पाठवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे कराटे समर कॅम्प यशस्वीरित्या संपन्न झाले. विद्यार्थी /पालकांकडून जिल्हा संघटना व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.


