ग्रामपंचायत जयगड आदिशक्ती अभियान समितीमार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी काढली प्रभातफेरी

जयगड दि. २६ :- ग्रामपंचायत जयगड आदिशक्ती अभियान समितीमार्फत आज महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक भव्य अशी प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी पेठवाडी मराठी शाळा या ठिकाणाहून सुरू होऊन साईमार्गाने ग्रामपंचायत जयगड सडेवाडी मराठी शाळा आणि पुन्हा तेथून ग्रामपंचायत जयगड कार्यालय अशी काढण्यात आली होती.
यानंतर ग्रामपंचायत जयगडच्या छत्रपती श्रीशिवाजी महाराज सभागृहात महिलांसाठी मार्गदर्शनपर मेळावा घेण्यात आला. यावेळी आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती स्वप्नाच्या मयूर खाडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर सचिव श्रीमती तारका पारकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे स्वागतगीत सौ. वैष्णवी विश्वास पवार यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केले.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती श्रीशिवाजी महाराज, आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच श्रीलक्ष्मी देवी यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जयगड विद्यामंदिर येथील प्राध्यापिका सौ.श्रद्धा पाष्टेमॅडम ,सौ. पारकर सिस्टर, ग्रामविकास अधिकारी श्री. श्रीकांत कुळ्ये .आदिशक्ती अभियान समितीचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच जयगड श्री. अनिरुद्ध साळवी. पर्यवेक्षिका श्रीमती केतकर मॅडम, श्रीमती तारका पारकर, सडेवाडी शाळेचे श्री.पवार सर, श्रीमती श्रुती मेस्त्री, जयगडचे पोलीस पाटील श्री.प्रसाद गुरव, जयगड विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप वाघोदे,तसेच आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षा सौ.स्वप्नजा मयूर खाडे यांनी मार्गदर्शन केले.
खास आकर्षण म्हणजे कुमारी ओवी परकर या चिमुरड्या मुलीने संविधान अर्पण पत्रिकेचे केलेले मुखोद्गत वाचन. यावेळी जयगड मधील महिला भगिनी तसेच विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रभात फेरीमध्ये मुलींच्या हातामध्ये महिलांबाबत घोषणा वाक्य फलक होते. तसेच महिला सक्षमीकरण, सबलीकरण, स्वावलंबीकरण याबाबत घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण जयगड गावांमध्ये या कार्यक्रमामुळे एक चैतन्य निर्माण झाले आहे. महिला वर्गाचा सक्रिय आणि आनंदी सहभाग या निमित्ताने जयगडमध्ये दिसून आला.
या कार्यक्रमाला महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. कमलाकर बोरकर, जयगडच्या तलाठी श्रीमती श्रद्धा दैत, आदिशक्ती अभियान समितीचे सदस्य तथा माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. जितेंद्र पारकर, माजी पोलीस पाटील श्री. विकास पारकर , श्री.दिलीप राऊत,माजी सरपंच श्रीमती डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना ग्रामपंचायत जयगडचे सर्व कर्मचारी श्रीमती हर्षदा खाडे श्रीमती पुनम देवरुखकर श्रीयुत प्रमोद झगडे सुयुत संतोष पवार,पेठवाडी शाळेचे श्री.पवार सर, जयगड उर्दू शाळेचे श्री.चामे सर, सडेवाडी मराठी शाळेचे श्री.पिसे सर, आशा सेविका सौ.साक्षी खाडे, श्री.बाविस्कर सर, श्री.विकी पारकर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच या अभियानाची आकर्षक रंगावली जयगड चे सुपुत्र प्रसिद्ध रांगोळीकार श्रीयुत गणेश पांडुरंग भोपळे यांनी काढली.



