रत्नागिरी

गोगटेच्या झेप महोत्सवामध्ये आर.ई.एस. आणि महाराजा करंडक संगीत विभागाने पटकावला

रत्नागिरी दि. २६ : – रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने प्रायोजित केलेला झेप सांस्कृतिक महोत्सवमध्ये ओवर वॉल चॅम्पियनशिपसाठी फिरता आर इ एस करंडक आणि १० हजार रुपये दिले जातात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट साठी नाट्य ,नृत्य, वाङमय, संगीत, फाइन आर्ट,फॅशन आणि उद्योजक असे सात विभाग निर्माण करण्यात आले आणि आवड असलेले विद्यार्थी इव्हेंट मॅनेजमेंटसाठी एकत्र येतात हे विद्यार्थी संपूर्ण महाविद्यालयातील वरील सात विभागांमध्ये सहभाग घ्यावा म्हणून कलाकार विद्यार्थांना आवाहन करतात. या स्पर्धेची उत्सुकता आणि चुरस वाटावी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट साठी प्रोत्साहन द्यावे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने आर इ एस करंडक सुरू केला. यावर्षी संगीत विभागाने प्रथम क्रमांक आणि आर इ एस करंडक जिंकला द्वितीय क्रमांक नृत्य विभागाने तर तृतीय क्रमांक उद्योजक विभागाने जिंकला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना इव्हेंट मॅनेजमेंट चे महत्त्व समजावे आणि हे कौशल्य अवगत करावे म्हणून 1995 च्या महाराजा ग्रुपच्या 11 मित्रांनी 2005 मध्ये महाराजा करंडक प्रायोजित केला. यावर्षी या करंडकला वीस वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीच्या काळामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय यासंदर्भात वर्कशॉप घेण्यात आले. बघता बघता विद्यार्थ्यांमध्ये महाराजा करंडक संदर्भामध्ये क्रेज तयार झाली.

बहुतांशी महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक महोत्सव म्हणजे केवळ कलांचा महोत्सव होत असतो. परंतु महाराष्ट्रामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे आयोजन आणि स्पर्धा घेणारे गोगटे कॉलेज एकमेव आहे. खातू नाट्य मंदिरमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रेक्षक यांच्यासमोर आपली कला सादर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन द्यावे लागते. यासाठी योग्य नियोजन आणि योग्य विद्यार्थ्यांना योग्य प्रोत्साहन देण्याची गरज असते प्राध्यापक सहकार्य करतात. परंतु आपले जवळचे मित्र प्रोत्साहन करतात. त्यावेळेला सहज आत्मविश्वास वाढतो हाच धागा घेऊन महाराजा करंडक इव्हेंट मॅनेजमेंट साठी स्पर्धा सुरू झाली.

महाराजा करंडक यावर्षी आपणच जिंकायचा यासाठी महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतल्यापासून सीनियर मंडळी तयारी करत असते. वीस वर्ष गुणवत्तेच्या दिशेने जाणाऱ्या या करंडक साठी महाविद्यालयातील प्राध्यापक कायमच प्रोत्साहन देत असतात. यावर्षी महाराजा करंडक आणि प्रथम क्रमांक संगीत विभागाने पटकावला. संगीत विभागाने चार तासाचा अतिशय उत्तम कार्यक्रम सादर केला. एकेरी आणि दुहेरी गाण्याच्या स्पर्धेबरोबर महाविद्यालयांमध्ये गेल्यावर्षी सुरू झालेल्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक तासाचे कॉन्सर्ट तयार केली होती. त्याला मार्गदर्शन कश्मिरा सावंत यांनी केले. असा संपूर्ण संगीत विभागाचा उत्कृष्ट कार्यक्रम झाल्यामुळे त्याला महाराजा करंडक प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक नृत्य विभागाने तर तृतीय क्रमांक उद्योजक विभागाला मिळाला.

सदर कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सह कार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या माजी उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, झेप समन्वयक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर विद्यार्थी सचिव सुमित पाध्ये, सांस्कृतिक प्रतिनिधी प्रसिद्धी सोनवणे महाराजा ग्रुपचे सदस्य श्री राजेश जाधव, श्री संदेश कीर उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button