रत्नागिरी

समाजातील सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कार्य कौतुकास्पद – रोहन बने 

डिंगणी येथे ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न

देवरूख दि. २५ :-  तालुक्यातील डिंगणी खाडेवाडी येथे पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी आणि मैत्री ग्रुप फाउंडेशन यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते

आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे, आजारांचे लवकर निदान व उपचार करणे, आरोग्य जागरूकता वाढवणे, ग्रामीण भागातील वंचित लोकांना मदत करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांना प्रोत्साहन देणे ज्यामुळे समुदायाचे आरोग्य सुधारणे व खर्चात बचत व्हावी. यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सामान्य माणसाला दिलासा मिळावा याच उद्देशाने डिंगणी येथे शिबिर आयोजित करण्यात होते असे सुदर्शन मोहिते यांनी सांगितले.

या शिबिरात विविध तपासण्या (रक्त, डोळे, मधुमेह, रक्तदाब), तज्ञांचा सल्ला आणि जीवनशैली बदलांबद्दल मार्गदर्शन देण्यात आले, ज्यामुळे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास मदत होते.

सुगम आरोग्य सेवा, लवकर निदान आणि उपचार, आरोग्य शिक्षण, खर्चात बचत, विशिष्ट गरजांची पूर्तता, सामुदायिक आरोग्य यामुळे अशी आरोग्य शिबिरे ही आरोग्य सेवा आणि जागरूकता यांच्यातील दुवा आहेत. समाजातील सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांनी सांगून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

या वेळेस तब्बल 75 लाभार्त्यांनी विविध आजारावर लाभ घेतला. या आरोग्य शिबिरास शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक व जिल्हापरिषद चे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर चाळके, अंकेश चाळके व सुदर्शन मोहिते यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button