रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल, भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी
भाजपा नेते प्रशांत यादव यांनी घेतली महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

रत्नागिरी दि. १९ :- रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, यासाठी भाजप नेते प्रशांत यादव यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप प्रदेश कार्यालयात भेट घेण्यात आली.
ही भेट भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर उपस्थित होते.
या भेटीत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी मांडून, रिक्त पदांमुळे रखडलेली कामे व सेवांवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.



