रत्नागिरी
भक्ती चव्हाण या विद्यार्थीनीची चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोतम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड

गुहागर दि. १६ :- मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन हेदवीच्या कु. भक्ती रमाकांत चव्हाण या विद्यार्थीनीची चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोतम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
याआधीही तिची दिवाळी अभ्यास वर्गासाठी निवड झाली होती . कु भक्ती हिने खेळामध्येही तालुकास्तर व जिल्हास्तरावर नैपुण्य दाखवले आहे. याशिवाय वक्तृत्व, नृत्य अशा सर्वच शालेय उपक्रमात तीचा सहभाग असतो. हा पुरस्कार प्राप्त होण्यासाठी तिला वर्गशिक्षक गायकवाड सर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. याबद्धल तिचे शाळेचे मुख्याध्यापक श्री जोगळेकर, श्री. चव्हाण सर, श्री. मोरे सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर स्टाफ यांचावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. सर्व पालक वर्ग व ग्रामस्थांकडून तिचे कौतुक होत आहे.



