रत्नागिरी शहर पोलीस हद्दीमधील २ सराईत गुन्हेगारांवर ४ जिल्ह्यातून हद्दपार कारवाई
लांजा पोलीस ठाणे हद्दीमधील एका गुन्हेगारावर रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार कारवाई

रत्नागिरी दि. १६ :- रत्नागिरी शहर पोलीस हद्दीमधील २ सराईत गुन्हेगारांवर ४ जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, लांजा पोलीस ठाणे हद्दीमधील एका गुन्हेगारावर रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीला आळा घालणेकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश व सूचना दिलेल्या होत्या.
या अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सलमान उर्फ आकाश अशोक डांगे रा. साईश्वरी अपार्टमेंट, वॉचमन रूम, रा. थिबा पॅलेस माळ नाका, रत्नागिरी, ता.जि. रत्नागिरी याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे तसेच अंमली पदार्थ विक्री सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच आमिर नजिर मुजावर, टा. घर नं.1385, राजीवडा नाका, ता. जि. रत्नागिरी याचे वर शरीरा विरुध्दचे गंभीर गुन्हे तसेच महिलांविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे रत्नागिरी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता.
अंमली पदार्थ विक्री करण्यात सलमान उर्फ आकाश डांगे हा सराईत असल्याने शहरातील अनेक तरुण मुले अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन त्याचा समाज जीवनावर विपरीत परिणाम होत होता व आमिर नजिर मुजावर याच्या मुळे महिलांचे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला होता.
सलमान उर्फ आकाश डांगे व आमिर नजिर मुजावर यांची गुन्हे करण्याची प्रवृत्ती बळावलेली होती. त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबविणे करिता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातून त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबत, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 (1) (अ) अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांचे कडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते.
या प्रस्तावाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. निलेश माईनकर व पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे श्री. विवेक पाटील यांनी पाठपुरावा केल्याने उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांनी सलमान उर्फ आकाश डांगे व आमिर नजिर मुजावर यांना रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड व कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करणे बाबत आदेश काढल्याने हद्दपार इसम सलमान उर्फ आकाश अशोक डांगे रा. साईश्वरी अपार्टमेंट वॉचमन रूम, टा. थिबा पॅलेस माळ नाका, रत्नागिरी, ता.जि. रत्नागिरी व आमिर नजिर मुजावर, रा. घर नं. 1385, राजीवडा नाका, ता.जि. रत्नागिरी यांच्यावर हद्दपारीची कारवाई करणेत आलेली आहे.
तसेच लांजा पोलीस ठाणे हद्दीमधील राहणार सराईत गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे, रा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी याचे वर लांजा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 व भा. द. वि. संहिता कलम 457, 380 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या अनुषंगाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. सुरेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे, लांजा पोलीस ठाणे यांनी गुरुनाथ यशवंत तावडे, टा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी याचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी, राजापूर यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता.
सदर प्रस्तावावर मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी, राजापूर यांनी सराईत गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे, रा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी याला 2 वर्षाच्या कालावधीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये हद्दपार केलेले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. सुरेश कदम यांचे मार्गदर्शनाप्रमाणे लांजा पोलीस ठाणे हद्दीतील गुरुनाथ यशवंत तावडे, रा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी याचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये रत्नागिरी जिल्ह्यातून 02 वर्षे कालावधी करिता हद्दपार आदेश पारित करण्यात आलेला आहे.



