रत्नागिरी

करजूवेतील अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल

तहसीलदार अमृता साबळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली माहिती

देवरूख दि. १२ (सुरेश सप्रे) :- करजुवे येथील खाडीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याबाबत विविध समाज माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांची दखल घेत महसूल विभागाने कारवाई करत दिनांक 11.10.2025 रोजी ग्राम महसूल अधिकारी करजुवे यांनी करजुवे ते माखजन या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करतेवेळी आढळलेल्या MH-08-AP-3029 या वाहनावर पोलीस ठाणे संगमेश्वर येथे गुन्हा दाखल केला आहे.

जयगड खाडीमधील, गट – डी, उपगट डी-2 या गटामधील ड्रेझरला वाळू उत्खननाची अधिकृत परवानगी असून या ड्रेझर मधील वाळूचा तात्पुरता साठा करजूवे येथे करणेत येत असलेने या ठिकाणाहून वाळू विक्री होत आहे.तसेच मौजे करजूवे ता. संगमेश्वर येथे अवैध वाळू उपसा व वाहतूकीला आळा बसविणेसाठी माखजन मंडळामध्ये स्वतंत्र गस्ती पथक नियुक्त करणेत आले आहे. सदर गस्ती पथकामार्फत दैनंदिन गस्त घालणेत येत असून अशा अवैध उत्खननाबाबतच्या घटना निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द तात्काळ कारवाई करणेत येत असल्याची माहिती तहसीलदार अमृता साबळे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

सदर पथकाने गस्ती दरम्यान निदर्शनास आलेल्या अवैध वाळू उत्खननाप्रकरणी कारवाई करतेवेळी दिनांक 02.06.2025 रोजी वाळू उत्खनन करणारे यांचेकडून पथकातील कर्मचारी यांचा रस्ता अडवून, दमदाटी करून शिवीगाळ केली असल्याने पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करणेत आला आहे. तसेच मौजे करजूवे ता. संगमेश्वर येथील खाडीकिनारी संभाव्य अनधिकृत वाळू उपसा व वाहतूकीच्या ठिकाणी दिनांक 08.12.2025 रोजी मंडळ अधिकारी माखजन यांचे गस्ती पथकाने भेट देऊन पाहणी केली असता खाडी किनारी वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारा एक जेसीबी क्र. एमएच 09 सीएल- 0507 आणि वाहतूक करण्यासाठी आलेला एक टाटा डंपर क्रमांक एमएच 08 – डब्ल्यू 8724 मिळून आला. सदर ठिकाणी खाडीपात्रामधून अनधिकृतपणे वाळू उपसा करणारे सुरज उदय नलावडे, रा. करजूवे, डंपर चालक राजकूमार प्रजापती सध्या रा. गोवळकोट, ता.चिपळूण जि.रत्नागिरी आणि जेसीबी चालक शकील अहमद, सध्या रा. टीआरपी, रत्नागिरी यांचेवर पोलीस दूरक्षेत्र माखजन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी आणि डंपर जप्त करून पोलीस दूरक्षेत्र माखजन येथे जमा करण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी संक्शन पंपाद्वारे अनधिकृतपणे उपसा करून सुमारे 25 ब्रास वाळू अनधिकृतपणे साठा केलेला मिळून आले. सदरचा वाळू साठा पंचनामा करून अनिल गोपाळ भामटे, पोलीस पाटील मौजे पिरंदवणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे. करजुवे येथील व्यक्तीने पोलीस ठाणेचे तक्रार निवारण क्रमांक 112 वर केलेल्या तक्रारीवेळी तात्काळ पोलीस विभागाने करजुवे येथे एकूच चार वाहनांवर कारवाई केली असून सदर वाहने जप्त केली आहेत, ही कारवाई वेळी ग्राम महसूल अधिकारी करजूवे व मंडळ अधिकारी माखजन यांचे उपस्थित करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय दिनांक 28.01.2022 अन्वये अवैध वाळू उत्खननास आळा बसविणेसाठी ग्रामस्तरावर ग्राम दक्षता समिती स्थापन करणेची आहे. सदर समितीचे अध्यक्ष हे सरपंच असल्याने मंडळ अधिकारी माखजन यांनी दिनांक 09.06.2025 रोजी सरपंच करजूवे यांना ग्राम दक्षता समितीच्या बैठका घेऊन वाळू उत्खननास आळा बसविणेसाठी आवश्यक उपाययोजना करणेकामी दक्षता घेणेबाबत तसेच सहकार्य करणेबाबत ग्रामपंचायतीचे बैठकीमध्ये व लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सदरचे ठिकाणी अवैध वाळू उपसा व वाहतूकीबाबतच्या घटना निदर्शनास आल्यास या कार्यालयाकडून तात्काळ कारवाई करणेत येणार आहे दररोज गस्ती पथकामार्फत गस्त घालणेची कार्यवाही सुरु असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button