देवरुख खालची आळीतील ९९व्या महापुजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवरूख दि. १२ ( सुरेश सप्रे) :- देवरूख येथिल महापुरुष पार खालची आळी देवरूख ची ९९ वी महापुजे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज देवरुख. खालची आळी तर्फे पिंपळाचे (महापुरुष) पारावर शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी ९९वी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
या ९९व्या पुजेनिमित्ताने तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा दि. २२ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ
२२ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६.०० वा. मान्यवरांचे हस्ते संपन्न होणार आहे. तर बक्षिस समारंभ
दि. २४ डिसेंबर रोजी रात्रौ १०.०० वा. उपस्थित मान्यवरांचे हस्ते संपन्न होणार आहे.दी. २५ रोजी रात्री ९वा.स्थानिकांचे विविध गुणप्रदर्शन कार्यक्रम. दि.२६ रोजी सायंकाळी ६ते८महीलांसाठी फनी गेम्स व स्थानिक भजन तर शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. ग्रामदेवता सोळजाई देवीस आमंत्रण व रात्रौ ठिक १०.०० वा संतोष पवार लिखित, दोन अंकी तुफान विनोदी नाटक “यदा कदाचित”. सादरकर्ते देवरुख खालची आळीचे मंडळाचे कलाकार
दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी स. भेटी उत्तर पूजा व श्रींचे मिरवणूकीचे विसर्जन, रात्री १०.०० वा. समारोप कार्यक्रम अजित सावंत यांचे घरी मंडळाचे ओटीवर होणार आहे
तरी सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



