रत्नागिरीराजकीय

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भाजपा महायुतीची रत्नागिरीत महत्वपूर्ण बैठक

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री उद्योग मंत्री ना. उदय सामंत करणार मार्गदर्शन

रत्नागिरी दि. १९ :- नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी शिवसेना भाजपा महायुतीच्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक ११.३० वाजता हॉटेल विवेक देसाई बँक्वेट हॉल माळनाका रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री उद्योग मंत्री ना. उदय सामंत हे मार्गदर्शन करणार आहेत. भाजप शिवसेना आणि मित्रपक्ष यांच्या संयुक्त बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीला महायुतच्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button