नाटे पोलीस ठाण्याकडून नाणार येथील चोरीचा गुन्हा उघड; एकाला घेतले ताब्यात

रत्नागिरी दि. १ :- नाटे पोलीस ठाण्याकडून नाणार येथील चोरीचा गुन्हा उघड करण्यात आली असून, या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीचा सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
दिनांक 11/05/2025 रोजी ६.३० वा ते 09/10/2025 रोजी सकाळी ९ वा च्या मुदतीत नाटे पोलीस ठाणे हद्दी मधील नाणार पाळेकरवाडी, येथील सुरेश मरतू प्रभू यांच्या राहत्या घरातून अज्ञात इसमाकडून एक LG कंपनीचा काळ्या रंगाचा स्मार्ट टीव्ही, टाटा कंपनीचा सेट-अप बॉक्स व एक लाल रंगाचा एच.पी गॅस कंपनीची सिलेंडर टाकी असा एकूण ₹10,000/-किमतीचा मुद्देमाल चोरण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाटे पोलीस ठाणे येथे दिनांक 12/10/2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 76/2025 भारतीय न्याय संहिता चे कलम 305, 324 (4) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ व पथक करीत होते.
दिनांक 27/11/2025 रोजी आरोपी विजय मधुकर गुरव, वय 29 रा. शिरगाव ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर याचा वरील नमूद गुन्ह्यांत कोल्हापूर कळंबा कारागृह येथून ताबा घेण्यात आला व नाटे पोलीस ठाणे कडून कसून चौकशी करण्यात आली व या चौकशी दरम्यान त्याने वरील नमूद गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने व आरोपीत याने मेमोरेंडम पंचनाम्याचे वेळी काढून दिलेला असून सागरी पोलीस ठाणे नाटे गुन्हा रजिस्टर नंबर 76/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305, 324 (4) या गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व (100%) मुद्दे माल हा नाटे पोलीस ठाणे मार्फत हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी विजय मधुकर गुरव, वय 29 रा. शिरगाव ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यास मा. न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दिनांक 01/12/2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नाटे पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांनी व श्रेणी पो.ऊ.नि, श्री. झगडे, स.प.फौ/29 चव्हाण, पो.कॉ/410 पाटील, पो.कॉ/334 कुसळे या पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे.



