
रत्नागिरी दि. ३० :- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत, रत्नागिरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीत नगर परिषद निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक तयारी आणि स्थानिक विकास अशा विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, जनतेच्या आशीर्वादाने हा विश्वास निश्चितच अधिक दृढ होईल, असे सांगितले.
या प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि निवडणूक जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन, निवडणूक संयोजक व रत्नागिरी शहर संयोजक श्री. सचिन वहाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा सरचिटणीस श्री. उमेश कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता देसाई आणि श्री. राजू भाटलेकर उपस्थित होते.



