रत्नागिरी

खेड तालुक्यातील दहिवलीत जमिनीला मोठ्या भेगा

खेड दि. १२ जुलै :- खेड तालुक्यातील दहिवली गावावर संकटाचे सावट कायम असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण दरड दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता गावातील काही ठिकाणी जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी दहिवली येथे भेट देत भेगा पडलेल्या परिसराची पाहणी केली.

स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, भीती आणि सुरक्षिततेबाबत चर्चा केली.बाधित कुटुंबाना आवश्यक ती मदत, धोकादायक भागांचे तातडीने सर्वेक्षण, तसेच आवश्यक असल्यास नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याबाबत संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी धाडवे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button