रत्नागिरी

गणपतीपुळे फुणगूसमार्गे शास्त्रीपूल रस्त्याची दुरवस्था

रत्नागिरी दि. १२ जुलै :- तालुक्यातील गणपतीपुळे फुणगूस मार्गे शास्त्रीपूल रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून, या धोकादायक रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

चिखलमय बनलेल्या या मार्गावरून प्रवास करताना दुचाकी घसरून पडत आहेत, तसेच रिक्षाही या चिखलात अडकून पडल्याचा प्रकार घडला होता. या मार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, चिपळूणमार्गे गणपतीपुळेकडे आल्यावर शास्त्रीपूलमार्गे फुणगूस, जाकादेवी, चाफे, गणपतीपुळे हा जवळचा मार्ग आहे. या मार्गाचा पर्यटक मोठ्या प्रमाणात वापर करतात, परंतु या मार्गावर थोडे पुढे आल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांचे हाल होत आहेत.

येथील ठेकेदार व संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. सध्या या मार्गाने जाणे कठीण झाले असून, तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button