रत्नागिरी

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या शुभहस्ते स्मार्ट ए. आय “रत्नसेतू” या व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे लोकार्पण

रत्नागिरी दि. २४ :-  कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे (भा.पो. से.) यांच्या शुभ हस्ते स्मार्ट ए. आय “रत्नसेतू” या व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रत्नागिरी पोलीस दलाच्या स्मार्ट ए.आय “रत्नसेतू” या व्हॉट्सअॅप चॅटबॉट चा लोकार्पण सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे (भा.पो. से.) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

“रत्नसेतू” या चॅटबॉटद्वारे नागरिकांनी त्यांच्या विविध तक्रारी, माहिती किंवा समस्या व्हॉट्सअॅप नंबर 9371415612 यावर पाठवता येणार आहेत.

या चॅटबॉटची ज्येष्ठ नागरिक सहायता, बाल मदत सहायता, महिला सहायता, उद्योग-व्यापार सहायता, गोपनीय सूचना, सागरी सुरक्षा सहायता अशा स्वरुपाची माहिती देणे अगर घेणे इत्यादी माहिती करिता या डिजीटल माध्यमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. नागरिकांना त्यांनी नोंदविलेल्या तक्रारींची सद्यस्थितीची माहिती मोबाइलच्या एका क्लिकवर मिळणे शक्य होणार आहे.

“रत्नसेतू” – स्मार्ट ए. आय चॅटबॉट, या जलद, सोप्या आणि ऑनलाईन सेवेचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे, यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button