रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील हरविलेले १८७ मोबाइल नागरिकांना परत

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते मूळ मालकांना मोबाईल दिले परत

रत्नागिरी दि. २४ :- जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अंमलदार यांनी एकत्रित काम करून गहाळ झालेल्या सर्व मोबाइलचा शोध घेतला व या प्रक्रियेत मध्ये एकूण १८७ मोबाइलचा शोध घेऊन ते परत मिळवण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाइलची माहिती सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीच्या पोलीस निरीक्षक श्रीमती. स्मिता सुतार, पो.शि. / 988 अजिंक्य ढमढेरे यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अंमलदार यांनी एकत्रित काम करून गहाळ झालेल्या सर्व मोबाइलचा शोध घेतला व या प्रक्रियेत मध्ये एकूण १८७ मोबाइलचा शोध घेऊन ते परत मिळवण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे.

आज दि. २४ नोव्हेंबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे (भा.पो.से) यांच्या शुभहस्ते हे सर्व मोबाइल त्यांचे मूळ मालकांना परत देण्यात आले तसेच सायबर क्राईम सारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधण्याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रसंगी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री. निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. सुरेश कदम व पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button