
रत्नागिरी दि. २३ :- शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी लांजा – राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचेकडे धाराशीव आणि दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्याकडे सोलापूर ‘जिल्हा संपर्कप्रमुख’ पदाची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे राज्यातील ‘जिल्हा संपर्कप्रमुख’ जाहीर करण्यात आले आहेत. यात माजी आमदार राजन साळवी आणि माजी आमदार संजय कदम यांच्याकडे अनुक्रमे धाराशीव व सोलापूर जिल्ह्यातील संघटना वाढीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली ही नवीन जबाबदारी, प्रामाणिकपणाने पार पाडेन, असा विश्वास माजी आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला आहे.



