माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला आयएसटीईचा सर्वोत्तम विद्यार्थी चॅप्टर (पदवी) पुरस्कार प्राप्त

देवरुख दि. २० :- प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयएसटीई (ISTE) ISTE महाराष्ट्र-गोवा विभागिय स्तरावरी सर्वोत्तम विद्यार्थी चॅप्टर (पदवी) पुरस्कार २०२५- साठी निवड झाली.
पुण्यातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झालेल्या आयएसटीई (ISTE) विद्यार्थी अधिवेशन २०२५ पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांना आयएसटीई विद्यार्थी अधिवेशन २०२५ दरम्यान एका सत्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुनील भिरुड; एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. विलास सपकाळ; सहसंचालक तांत्रिक शिक्षण पुणे डॉ. डी. व्ही. जाधव; आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, नवी दिल्ली; डॉ. सुहास खोत,प्राचार्य,केजेसीईएमआर, पुणे आणि इतर अनेक मान्यवरच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
आयएसटीई ही एक देशातील तांत्रिक शिक्षण आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांची गुणवत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणारी सर्वात मोठी स्वायत्त संस्था आहे. दरवर्षी आय एस टी ई नवी दिल्ली , विद्यार्थी अधिवेशनादरम्यान राज्य विभागातून नामांकित केलेल्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चॅप्टर (पदवी किंवा पदविका प्रदान करणाऱ्या संस्थांना) सन्मानित करते. या पुरस्कारासाठी महाविद्यालयांची निवड करताना त्यांच्या विद्यार्थी चॅप्टरची शैक्षणिक उत्कृष्टता, नेतृत्व आणि आय एस टी ई कार्यक्रम तसेच उपक्रमांमधील महाविद्यालयाचे योगदान यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
महाविद्यालयाचे आयएसटीई विद्यार्थी आणि प्राध्यापक विभागप्रमुख डॉ. एस. एन. वाघमारे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांसाठी आयएसटीई अंतर्गत आयोजित केलेल्या विविध कार्यक्रम तसेच उपक्रमांमुळे महाविद्यालयाने या पुरस्काराला गवसणी घातली.
प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन आणि त्यांच्या उल्लेखनीय योगदान आणि कामगिरीद्वारे संस्थेला गौरव मिळवून दिल्याबद्दल त्यांचे संस्थाध्यक्ष रविंद्र माने. उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने. सीईओ प्रद्युम्न माने यांनी कौतुक केले



