खेडमध्ये शिवसेना-भाजपा महायुती एकत्र निवडणूक लढणार!

खेड दि. २० :- शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपाचे रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक संयोजक श्री. वैभव खेडेकर यांनी खेड येथील महायुती निवडणूक कार्यालयात भेट घेतली.
खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केला. तसेच एकमेकांच्या विरोधात उभे केलेल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेऊन महायुतीच्या विजयाचा रस्ता सुकर करण्याचा निर्णयही या भेटी दरम्यान घेण्यात आला. त्यामुळे खेडमध्ये महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.
या बैठकीस शिवसेना उपनेते तथा माजी आमदार श्री. संजयजी कदम, भाजपा शहर अध्यक्ष श्री. अनिकेत कानडे, शिवसेना शहराध्यक्ष श्री. कुंदन सातपुते श्री. संजय बुटाला तसेच शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



