रत्नागिरी

रत्नागिरी शहराला सर्वांग सुंदर शहर बनवणे हे नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचे ध्येय : ना. उदय सामंत

रत्नागिरी नगर परिषदेवर महायुतीचा भगवा फडकणार!

रत्नागिरी दि. १७ :- रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्यादृष्टीने विकसित व्हाव यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतोय. रत्नागिरी शहराला सर्वांग सुंदर शहर बनवणे हे नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचे ध्येय आहे आणि त्यांना शासन म्हणून आम्ही सपोर्ट करणार असून, या निवडणुकीत रत्नागिरी नगर परिषदेवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. एकूण ३२ जागांपैकी ६ जागांवर भाजपाचे उमेदवार उभे असून, २६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत शिल्पाताई १०० टक्के रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्ष होतील आणि पारदर्शक कार्यक्रम, पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज हे नगरपालिकेमध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री असल्यामुळे माननीय शिंदे साहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली, असे ना. सामंत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एक वर्षांमध्ये नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व ३२ नगरसेवकांना रत्नागिरी शहरातल्या लोकांना परफॉर्मन्स द्यावाच लागेल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही. पारदर्शक कारभारच असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे, असे पालकमंत्री ना. सामंत यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेच्यावेळी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button