रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी दि. १६ :- रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यामध्ये प्रभाग क्रमांक ३ ब मधून प्रसाद सुरेश सावंत, प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये राजश्री बिपीन शिवलकर , प्रभाग क्रमांक ८ ब मधून साजीदखान अकबरखान पावसकर, प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये अमित वसंत विलणकर यांनी तर प्रभाग क्रमांक ९ ब मधून नाझनीन युसुफ हकीम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते माजी आमदार बाळ माने, प्रशांत साळुंखे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


