रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्याकरीता आलेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचे हस्ते लोकार्पण

रत्नागिरी दि. १५ :- रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेस बळकटी देणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे व निरपराध लोकांचे प्राण वाचवणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे या उद्देशाने व हेतूने रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचे शनिवारी दि. १५ रोजी पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आलेले आहे.

या इंटरसेप्टर वाहनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या सर्व वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर, सीट बेल्ट न लवणाऱ्यांवर (चारचाकी वाहने) व चुकीच्या दिशेने वाहन चालविणे तसेच सर्व चारचाकी व जड वाहनांकडून होणारे संबंधित वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर स्वयंचलित पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

हे इंटरसेप्टर वाहन संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत राहणार असून राज्य महामार्गावरील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होईल याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. या वाहनाद्वारे करण्यात येणारी दंडात्मक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व तांत्रिक माध्यमातून स्वयंचलित राहणार.

महामार्गावरील प्रवासी यांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे वाहन महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, श्री. निलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्या) श्रीमती. राधिका फडके, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे, श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, श्री. नितीन भोयर तसेच मोटार परिवहन विभाग अधिकारी तसेच सर्व वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार उपस्थित होते.

नागरिकांना आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गावर बेफिकीर व वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनचालकांसाठी हा स्पष्ट इशारा आहे. कृपया वाहतूक नियमांचे पालन करावे व निर्धारित वेग मर्यादेत वाहन चालवावे आणि अपघात व कायदेशीर कारवाई टाळावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button